जीतू नवलानी रॅकेट चालवायचा? सीबीआय चौकशीची मागणी, राऊतांच्या आरोपानंतर मोहित कंबोज न्यायालयात धाव घेणार

संजय राऊत यांनी ईडीवर (ED) तसेच केंद्रीय तपास यंत्रणावर आरोप केल्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज अँक्शन मूडमध्ये आले आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपींची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा मी कोर्टात जाईल, असा इशारा मोहित कंबोज यांनी केला आहे. 8 मार्च रोजी राऊत यांनी खूप आरोप केले होते.

    मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक सुरु आहे. संजय राऊत यांनी ईडीवर (ED) तसेच केंद्रीय तपास यंत्रणावर आरोप केल्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज अँक्शन मूडमध्ये आले आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपींची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा मी कोर्टात जाईल, असा इशारा मोहित कंबोज यांनी केला आहे. 8 मार्च रोजी राऊत यांनी खूप आरोप केले होते. सलीम-जावेद जसे नवीन काल्पनिक एपिसोड घेऊन येतात तसे राऊत हे एपिसोड घेऊन आले. त्यामुळं या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे व्हावी अशी मागणी भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

    दरम्यान, जीतू नवलानी अनेकांकडून पैसे घेत असल्याचे आरोप त्यांनी केले आहे. 13 पानांचे पत्रं त्यांनी दिले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असा आरोप त्यांनी केला आहे. राऊत यांनी 160 कोटी रुपयांचा आरोप केला. जीतू नवलानीने ईडीच्या नावाने पैसे घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या आरोपात तथ्य असते तर राऊत यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली असती. त्यामुळे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, असं मोहित कंबोज म्हणाले.

    राऊत यांनी जे आरोप केले आहेत त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सहमती होती का? मुख्यमंत्र्यांनी याबाबत सीबीआयला पत्र लिहिले पाहिजे. खंडणीची नवी सुरवात संजय राऊत करत आहेत का? असा सवाल कंबोज यांनी करत, राउतांवर टिका केली.