Jitendra Awhad Daughter Reception in Goa

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचे लग्न अगदी साधेपणाने मुंबईत ७ डिसेंबरला झाले, कोरोना संकटात राज्यात एक चांगला आदर्श घालून देत साधेपणाने नोंदणीपध्दतीने विवाह झाला म्हणून आव्हाड कुटुंबियांचे कौतुकही झाले. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या स्वागत सोहळ्यासाठी गोव्यात ग्रँन्ड संगीत सोहळा आयोजित केल्याची चित्रफित व्हायरल झाली आहे(Jitendra Awhad Daughter Reception in Goa). त्यामुळे आता आव्हाड यांनी मुलीचे लग्न साधेपणाने लावले की केवळ दिखावा केला अशा प्रकारची चर्चा जोरदार रंगल्या आहेत.

    मुंबई : राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचे लग्न अगदी साधेपणाने मुंबईत ७ डिसेंबरला झाले, कोरोना संकटात राज्यात एक चांगला आदर्श घालून देत साधेपणाने नोंदणीपध्दतीने विवाह झाला म्हणून आव्हाड कुटुंबियांचे कौतुकही झाले. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या स्वागत सोहळ्यासाठी गोव्यात ग्रँन्ड संगीत सोहळा आयोजित केल्याची चित्रफित व्हायरल झाली आहे(Jitendra Awhad Daughter Reception in Goa). त्यामुळे आता आव्हाड यांनी मुलीचे लग्न साधेपणाने लावले की केवळ दिखावा केला अशा प्रकारची चर्चा जोरदार रंगल्या आहेत.

    ग्रँड हयात हॉटेलमध्ये लग्नाचा संगीत स्वागत सोहळा

    गोव्यातील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाच्या लग्नाचा संगीत स्वागत सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक होते तर या कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मंत्री, बडे कलाकार आणि परदेशातील पाहुणे उपस्थित होते. तर स्वागत समारंभात बडी दिग्गज मंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    चित्रफित व्हायरल झाल्याने वेगळ्याच चर्चा

    राजकीय वर्तुळामध्ये नेत्यांच्या घरात लग्न समारंभाचे दिवस आहेत. त्यात अनेक नेते मंडळींच्या मुला-मुलींचे विवाहसोहळे थाटामाटात पार पडले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एका मुलीचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह स्पेशल मँरेज ऍक्टनुसार अत्यंत साध्या नोंदणी पद्धतीने झाला होता. त्यावेळी आव्हाडांवर कौतुकाचा वर्षाव झाला. पण गोव्यातील ग्रँड स्वागत सोहळ्याची चित्रफित व्हायरल झाल्याने आता वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत.