जितेंद्र आव्हाडांना फुकटात मंत्रीपद मिळालय, म्हणून त्यांना वळवळ करावी लागते; निलेश राणेंची टीका

जितेंद्र आव्हाडांना मंत्रीपद फुकटात मिळालं आहे. त्यामुळे त्यांना वळवळ करावी लागते. त्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचे हे प्रयत्न सुरु आहेत अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

    मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणावरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आणि रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली होती. रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट असल्याची टीका आव्हाड यांनी केली होती. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी पलटवार केला आहे.

    जितेंद्र आव्हाड कुणाचे एजंट आहेत? जितेंद्र आव्हाडांना नैतिक अधिकार आहे का?, असा सवाल निलेश राणे यांनी आव्हाडांना केला आहे. घरात इंजिनिअरला खेचून आणत मारणारे हे मंत्री. तुम्ही महिलेवर आरोप करताय, तुमच्या आरोपाचा आधार काय? जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या संदर्भातला एकतरी पुरावा आहे का? असा सवाल करत निलेश राणे यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाडांना मंत्रीपद फुकटात मिळालं आहे. त्यामुळे त्यांना वळवळ करावी लागते. त्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचे हे प्रयत्न सुरु आहेत अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

    जितेंद्र आव्हाडांचा आरोप ?

    शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.