jitendra awhad

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बीड मधील एका तरुणीने ही तक्रार केली आहे. मात्र, आता यावरुन देखील राजकारण सुरु झाले असून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बीड मधील एका उच्चशिक्षीत तरुणीने शेख यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महेबूब शेख यांनी नोकरी लावण्याच्या बहाण्याने ओखळ वाढवली. यानंतर मुंबईला जाण्याच्या नावाखाली कार मध्ये अत्याचार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हंटले आहे.

दरम्यान महेबूब इब्राहिम शेख यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच राजकीय हेतूने ही तक्रार दाखल केल्याचा आरोपही त्यांमनी केला आहे.

यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांच्याविषयी दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट आहे. मी स्वतः त्याच्याशी बोललो आणि त्याने सदरच्या बातम्या धादान्त खोट्या आहेत असे सांगितले. माझा महेबूब शेख वर विश्वास आहे. असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.