जाँटी प्लस इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात येणार, स्कूटरची १२० किमीची रेंज, ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात बुकिंग

दुचाकी चालकांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जाँटी प्लस लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हाय परफॉर्मेंस मोटरसह ६० व्ही/४० एएच लिथियम बॅटरीची क्षमता आहे, त्यामुळे या स्कटरला मोठी पसंदी आहे.

    मुंबई : दुचाकी चालकांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जाँटी प्लस लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हाय परफॉर्मेंस मोटरसह ६० व्ही/४० एएच लिथियम बॅटरीची क्षमता आहे. यासोबतच साइड स्टँड सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, फ्रंट डिस्क ब्रेक, डीआरएल लाईट्स यात क्रूझ कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम (ई-एबीएस), अँटी थेफ्ट अलार्म आणि मजबूत चेसिस आहेत. यासोबतच टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, हाय ग्राउंड क्लीयरन्स, आणि इंजिन किल स्विचसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे या स्कूटरला ग्रहकानी मोठी पसंदी देत बुकिंग सुरू केले आहे.

    जाँटी प्लस इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्टय व किंमत

    एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुशांत कुमार म्हणाले की, भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये तांत्रिकदृष्ट्या प्रगत जाँटी प्लस सादर करताना ब्रँडला आनंद होत आहे.
    स्टायलिश डिझाईन, डिजिटल डिस्प्ले आणि सर्वोत्कृष्ट सुरक्षा फिचर्स असलेले जाँटी हे उत्कृष्ट इलेक्ट्रिक बाईकच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी उत्तम पॅकेज आहे.

    या ई-स्कूटरची किंमत १ लाख, १० हजार, ४६० रुपये (एक्स-शोरूम) असेल.

    कंपनीचा दावा आहे की, इलेक्ट्रिक स्कूटर १२० किमीपेक्षा जास्त रेंज देईल आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास घेईल.

    दरम्यान, ही स्कूटर अत्यंत आकर्षक आणि सुंदर असून याला ग्राहकांनी मोठी पसंदी दर्शवली आहे, तसेच याचे बुकिंग मोठ्या प्रमाणत सुरू आहे.