राज्यपालांच्या हस्ते पत्रकार अविनाश पाठक यांच्यादोन पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक यांनी लिहिलेल्या ‘सत्तेच्या सावलीत’ आणि ‘दृष्टिक्षेप’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज दूरस्थ माध्यमातून संपन्न झाले. अविनाश पाठक यांचे ‘सत्तेच्या सावलीत’ हे पुस्तक राजकारणाच्या रंगमंचावरील कथांचे संकलन आहे तर ‘दृष्टिक्षेप’ हे  पुस्तक वैचारिक प्रासंगिक लेखाचा संग्रह आहे, असे नमूद करून पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांचे वैचारिक प्रबोधन होईल असे मत राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.

मुंबई (Mumbai). नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक यांनी लिहिलेल्या ‘सत्तेच्या सावलीत’ आणि ‘दृष्टिक्षेप’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज दूरस्थ माध्यमातून संपन्न झाले. अविनाश पाठक यांचे ‘सत्तेच्या सावलीत’ हे पुस्तक राजकारणाच्या रंगमंचावरील कथांचे संकलन आहे तर ‘दृष्टिक्षेप’ हे  पुस्तक वैचारिक प्रासंगिक लेखाचा संग्रह आहे, असे नमूद करून पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांचे वैचारिक प्रबोधन होईल असे मत राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.

अविनाश पाठक यांनी लिहिलेल्या ‘सत्तेच्या सावलीत’ आणि ‘दृष्टिक्षेप’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन

महाराष्ट ही साहित्यिकांची भूमी असून या राज्याने देशाला अनेक महान साहित्यिक दिले आहेत. राज्यातील खासदार अनेकदा हिंदीतून भाषणे करतात किंवा मराठीतून  बोलताना हिंदी भाषेतील संवादाची ‘फोडणी’ देतात असे सांगून भाषांमधील ही देवाण घेवाण कौतुकास्पद आहे असे राज्यपालांनी नमूद केले.

अविनाश पाठक यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रदीर्घअनुभवातुन आणखी पुस्तके लिहावीत अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. ओनलाईन झालेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माजी खासदार अजय संचेती, ‘चाणक्य वार्ता’ मासिकाचे आश्रयदाते लक्ष्मीनारायण भाला, जेष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर व ‘चाणक्य वार्ता’चे संपादक अमित जैन प्रामुख्याने उपस्थित होते.