मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी विशेष सूचना : आज घराबाहेर पडताना हे ध्यानात ठेवा, रात्र वैऱ्याची आहे; आनंदाला आवर घाला…अन्यथा करावा लागेल पश्चातापच

या ब्लॉक कालावधीत शनिवारी मध्य रात्री ११.५२ वाजल्यापासून ते रविवारी ११.५२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT, Mumbai) जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबणार नाहीत.

  • ठाणे : दिवसा पाचव्या-सहाव्या मार्गासाठी मध्य रेल्वे रविवारी घेणार २४ तासांचा मेगाब्लॉक
  • मेगाब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द!

मुंबई : ठाणे आणि दिवा पाचव्या – सहाव्या मार्गावरील (Thane And Diva 5th -6th Line) वळणासाठी नव्याने टाकलेल्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रूळांना जोडण्यासाठी कळवा आणि दिवा दरम्यान मध्य रेल्वेतर्फे तब्बल २४ तासांचा जम्बो ब्लॉक (JumboBlock) घेण्यात येणार आहे. रविवारी मध्य रात्री २ ते सोमवारी पहाटे २ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत १५० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या असून २० पेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

असा असणार जम्बोब्लॉक :

या ब्लॉक कालावधीत शनिवारी मध्य रात्री ११.५२ वाजल्यापासून ते रविवारी ११.५२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT, Mumbai) जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवले जातील आणि गंतव्य स्थानकावर निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या / अर्ध जलद सेवा मुलुंडहून येथून रविवारी पहाटे ०५.०५ वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी १.१५ वाजेपर्यंत मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानकावर १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

या स्थानकांवर लोकल उपलब्ध होणार नाही :

ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका परिवहन उपक्रमाशी समन्वय साधून बसेस चालवण्याची व्यवस्था देखील केली आहे. याशिवाय ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा स्थानकाच्या जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील.

शनिवारी रद्द झालेल्या मेल/एक्सप्रेस गाड्या

१२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस
१२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
१७६११ नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

रविवारी रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या

११००७ / ११००८ मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
१२०७१ / १२०७२ मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
१२१०९ /१२११० मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस
११४०१ मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
१२१२३ /१२१२४ मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
१२१११ मुंबई-अमरावती एक्सप्रेस
१२३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
११३९ मुंबई-गदग एक्सप्रेस
१७६१२ मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

सोमवारी रद्द होणाऱ्या गाड्या

११४०२ आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
१११४० गदग-मुंबई एक्सप्रेस

या मेल एक्स्प्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेट

पाचव्या सहाव्या मार्गिकेचा कामासाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे काही मेल- एक्स्प्रेस गाडया शॉर्ट टर्मिनेट केलेल्या आहेत. ज्यामध्ये १ जानेवारी २०२२ रोजी सुटणारी १७३१७ हुबळी-दादर एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल आणि २ जानेवारी २०२२ सुटणारी १७३१८ दादर-हुबळी एक्सप्रेस दादर ऐवजी पुण्याहून निघेल. १ जानेवारी २०२२ रोजी सुटणारी ११०३० कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल आणि २ जानेवारी २०२२ सुटणारी ११०२९ मुंबई – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबई ऐवजी पुण्याहून सुटणार आहे.