कंगना रणौतनं केली देशाचं नाव बदलण्याची मागणी, काय म्हणाली नेमकं ? : वाचा सविस्तर

आता कंगना एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. कंगनानं तिच्या पोस्टमध्ये देशाचं नाव बदलण्याची गरज असल्याचं म्हंटलं आहे. या पोस्टनं कंगनानं आता नव्या वादाला जन्म दिला आहे. कंगनानं देशाचं ‘इंडिया’ हे नाव बदलून ‘भारत’ असं करण्याची इच्छा व्यक्त केलीय. ‘इंडिया’ हे नाव ब्रिटीशांनी ठेवलं असून ते गुलामगिरीची आठवण करून देणारं आहे, असं ती म्हणाली.

    मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमी कोणत्या न कोणत्या काराणावरुन कोणाशी न कोणाशी पंगा घेताना दिसते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते.

    दरम्यान आता कंगना एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. कंगनानं तिच्या पोस्टमध्ये देशाचं नाव बदलण्याची गरज असल्याचं म्हंटलं आहे. या पोस्टनं कंगनानं आता नव्या वादाला जन्म दिला आहे. कंगनानं देशाचं ‘इंडिया’ हे नाव बदलून ‘भारत’ असं करण्याची इच्छा व्यक्त केलीय. ‘इंडिया’ हे नाव ब्रिटीशांनी ठेवलं असून ते गुलामगिरीची आठवण करून देणारं आहे, असं ती म्हणाली.

    कंगनानं यावेळी इंडिया आणि भारत या शब्दांचा अर्थ तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट केला आहे. कंगनानं तिच्या पोस्टमध्ये वेद, गीता आणि योग यावर भर देत देशाचं इंडिया हे नाव बदलून भारत हेच नाव ठेवण्याची मागणी केली आहे. यासोबतच इंडिया हे नाव गुलामीचं प्रतीक असल्याचं तिनं म्हटलं आहे. दरम्यान, आपला देश तेव्हाच प्रगती करू शकतो. जेव्हा सर्वजण आपलं प्राचीन आध्यात्म आणि ज्ञान यावर अवलंबून राहतील. हे आपल्या महान सभ्यतेचा आत्मा आहे. जग आपल्याकडे पाहिल आणि आपण त्याचे नेता म्हणून उभे असू, असंही कंगनानं म्हटलं.