The Association of Resident Doctors read out the difficulties before Aditya Thackeray

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि आक्रमक विरोधक समोरा समोर आले.निमित्त ठरले ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कर्नाटकातून धमकी आल्याच्या आरोपाचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळुरुमध्ये विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक कनेक्शनवरुन भाष्य करताना शिवसेने आमदार सुनील प्रभू यांनी आदित्य ठाकरे यांनाही कर्नाटकातून धमक्या आल्या होत्या, अशी माहिती सभागृहाला दिली(Karnataka connection of Aditya Thackeray's threat; Ruling and aggressive opponents face-to-face).

  मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि आक्रमक विरोधक समोरा समोर आले.निमित्त ठरले ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कर्नाटकातून धमकी आल्याच्या आरोपाचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळुरुमध्ये विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक कनेक्शनवरुन भाष्य करताना शिवसेने आमदार सुनील प्रभू यांनी आदित्य ठाकरे यांनाही कर्नाटकातून धमक्या आल्या होत्या, अशी माहिती सभागृहाला दिली(Karnataka connection of Aditya Thackeray’s threat; Ruling and aggressive opponents face-to-face).

  ठाकरे यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून अटक केल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या संदर्भात विशेष तपास समिती स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आरोपीच्या कर्नाटक संबंधावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

  आरोपी हा कर्नाटकमध्ये सापडला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांची हत्येचे धागेदोरे कर्नाटकमध्ये आहेत. या प्रकरणाचे काही धागेदोरे आहेत का, याचा उहापोह झाला पाहिजे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे असेही सुरेश प्रभू म्हणाले.

  सुशांत सिंह राजपूत आतापर्यंत ट्रेड होत आहे. तस्करी प्रकरणातील निलोत्पल उत्पलला सोशल मीडियावर ट्रेंड करण्यासाठी 30 लाख रुपये पुरवले. आम्हालाही धमक्या येत आहेत. या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे कर्नाटकशी जोडले आहेत असा आरोप
  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

  सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मुद्दा

  सत्ताधारी आणि विरोधकांत सुरु झालेल्या टीका-टिपण्णीवरून सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मुद्दा समोर आला. मंत्री छगन भुजबळ यांनी सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या काळात सनातनवर बंदी आणण्याचा प्रस्ताव आला होता, असं सांगितले. पण पुरावे नसल्याने कारवाई करता आली नाही, असे सांगत पलटवार केला.