मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले ; केशव उपाध्ये यांची राज्य सरकारवर टीका

आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर उपाध्ये यांनी वडेट्टीवार आणि भुजबळ यांच्यावर टीका आहे.

    मुंबई : राज्यातील आघाडी सरकार अपयशामुळे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले. ज्या जिल्हा परिषदांची केस होती तेथे आता पोटनिवडणूका लागल्या. मंत्री विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले. प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

    आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर उपाध्ये यांनी वडेट्टीवार आणि भुजबळ यांच्यावर टीका आहे.

    सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यावरुन आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका आहे.