खंडाळा-लोणावळा पर्यटकांनी गजबजले ; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा

जोडून आलेल्या सुटयांमुळे लोणावळा, कार्ला, मळवली, पवनानगर परिसरातील भुशी डॅम, लोणावळा तलाव, तुंगार्ली तलाव, राजमाची, कुणे गाव, रायवूड, लोहगड, एकवीरा-भाजे लेणी परिसर, पवना धरण परिसरातील सेकंड होम्स, खासगी बंगल्यामध्ये पर्यटकांनी बुकिंग केलंल आहे

मुंबई: नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी मुंबईतून गोवा, कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे आज मुंबई-गोवा महामार्गही ठप्प झाला होता. सकाळपासून दुपारपर्यंत वाहनांची रीघ पाहायला मिळाली. नववर्षाच्या मुहूर्तावर बाजारपेठ गजबजल्या असून, हॉटेल व रिसॉर्ट चालकांनी पर्यटकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. जोडून आलेल्या सुटयांमुळे लोणावळा, कार्ला, मळवली, पवनानगर परिसरातील भुशी डॅम, लोणावळा तलाव, तुंगार्ली तलाव, राजमाची, कुणे गाव, रायवूड, लोहगड, एकवीरा-भाजे लेणी परिसर, पवना धरण परिसरातील सेकंड होम्स, खासगी बंगल्यामध्ये पर्यटकांनी बुकिंग केलंल आहे. इतकेच नव्हेतर लोणावळा परिसरासह ग्रामीण भागांकडेही पर्यटकांचा कल वाढत आहे.
शुक्रवारपासूनच पर्यटकांची वर्दळ वाढल्याने ऐन वीकएंडला बोरघाटात द्रुतगती मार्गावर, तसेच लोणावळा-खंडाळ्यात जुन्या महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यासाचे दिसून येत आहे. खंडाळा परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल, रिसॉर्टसह बंगले मालकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी मुंबईतून गोवा, कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे आज मुंबई-गोवा महामार्गही ठप्प झाला होता.