‘हिम्मत असेल तर रोखून दाखवाच’ पुन्हा कोल्हापूरला जाण्यापूर्वी सोमय्यांचे सिध्दीविनायक दर्शन अन् सरकारला आव्हान

हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असे आव्हान देत सोमय्या यांनी सिद्धीविनायक मंदीराबाहेरूनच दर्शन(Somaiya At Siddhivinayak Temple) घेतले आणि कोल्हापूरला(Kolhapur) जावून उद्या आंबामातेचे दर्शन घेणार तसेच मुरगुड येथे जावून तक्रार दाखल करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

    मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला आव्हान देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनाच नोटीस देत असल्याचे म्हटले आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असे आव्हान देत सोमय्या यांनी सिद्धीविनायक मंदीराबाहेरूनच दर्शन(Somaiya At Siddhivinayak Temple) घेतले आणि कोल्हापूरला(Kolhapur) जावून उद्या आंबामातेचे दर्शन घेणार तसेच मुरगुड येथे जावून तक्रार दाखल करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


    पोलीस आयुक्तांना आव्हान
    सोमय्या म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. ते म्हणाले की, मी कोल्हापूरच्या पोलीस आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे की, तुमच्यात हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा.

    मुश्रीफांना कुणीही वाचवू शकणार नाही
    ते म्हणाले की, उद्या कोल्हापूरात जावून मुश्रीफ यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या घोटाळ्याचीही तक्रार करणार आहे. सोमय्या यानी आरोप केला की, पवार आणि ठाकरे यांच्या सांगण्यावरून गृहमंत्री वळसे पाटील यांनी पोलिसांचा गुंडांसारखा वापर केला. मात्र आता ते थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केला.