किरीट सोमय्या माझी फक्त बदनामी करताहेत – अनिल परब

मी कोणतंही चुकीचं काम केलं नाही. त्यामुळे कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेलच. भाजप नेते किरीट सोमय्या हे निव्वळ बदनामी करण्याचं काम करत आहेत. मात्र, कोर्टात आमचं निर्दोषत्व सिद्ध होईल, असा विश्वास मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला.

    मुंबई : मागील काही महिन्यापासून माझ्यावर माजी खासदार किरीट सोमय्या कुठलेही पुरावे नसताना आरोप करताहेत. याबद्दल मी १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. यात माफी मागण्याचीही मागणी केलीय. तसेच संबधित पुरावेही सुद्धा जोडले आहेत. यामुळं मला या प्रकरणात न्याय मिळेल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

    मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी न्यायमूर्तीचे काम हातात घेतलेले नाही. जसं किरीट सोमय्या न्यायमूर्तीचं काम हातात घेतात. बेछूट आरोप करून माझी प्रतिमा मलिन केली जात आहे. दरम्यान मंगळवारी जी आत्महत्या झाली ती दुर्देवी आहे. कुणीही आत्महत्या करू नये. पगार मागेपुढे झाले आहेत. प्रत्येक महिन्याचा पगार दिला जातोय. कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहलंय. आपले सर्व प्रश्न सुटतील. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यावरही परब यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. सरकारकडून पैसे घेऊन प्रत्येक महिन्याचा पगार दिला जातोय. तुमचं आयुष्य खूप अनमोल आहे. त्यामुळे आत्महत्या करून आयुष्य संपवू नका. तुमचे सर्व प्रश्न सुटतील. त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत, असं परब म्हणाले.

    मी कोणतंही चुकीचं काम केलं नाही. त्यामुळे कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेलच. भाजप नेते किरीट सोमय्या हे निव्वळ बदनामी करण्याचं काम करत आहेत. मात्र, कोर्टात आमचं निर्दोषत्व सिद्ध होईल, असा विश्वास मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला.

    लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक जिंकायची अधिकार आहे. लोकांसमोर आम्ही कामे घेऊन जाऊ. यावेळीही मुंबई पालिका निवडणूकीत जनता शिवसेनेवर विश्वास ठेवून, पुन्हा शिवसेनेच्या हाती जनता सत्ता देईल. भाजपने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मराठी कट्टा सुरू केला आहे. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळल्या जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येकाला निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी ते करत असतील. आम्ही लोकांसमोर कामे घेवून जाऊ. मुंबईकरांनी प्रत्येकवेळी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. शिवसेनेच्याच हातात मुंबई सुरक्षित राहील ही भावना मुंबईकरांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळं यावेळीही मुंबई पालिका निवडणूकीत जनता शिवसेनेवर विश्वास ठेवून, पुन्हा शिवसेनेच्या हाती जनता सत्ता देईल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.