शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे गुन्हे ठाकरे सरकारने केले माफ, मात्र महाराष्ट्राला लुटणाऱ्या सरकारला जनता माफ करणार नाही – किरीट सोमय्यांचा संताप

आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या छाबय्या विहंग गार्डन (Chhabhaiya Vihang Garden) इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव (Fine Cancelled For Chhabhaiya Vihang Garden) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या छाबय्या विहंग गार्डन (Chhabhaiya Vihang Garden) इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव (Fine Cancelled For Chhabhaiya Vihang Garden) आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सरनाईक यांच्या या बिल्डींगला महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र (OC) (Certificate Of Occupancy) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ठाणे येथील विहंग गार्डन चे अनधिकृत बांधकाम करणारे, ११४ सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईकचे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही”.

    किरीट सोमय्यांनी याविषयी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी २००८-०९ मध्ये ठाणे विहंग गार्डन येथील ११४ सदनिकाधारकांची फसवणूक केली, ५ मजले अनधिकृत बांधले. २०१२ मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आले. गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने मान्य केले की प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. तसेच त्यांच्याकडून सगळा दंड व व्याज वसूल केले जाणार, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळानी निर्णय घेतला की प्रताप सरनाईक आमच्या शिवसेनेचा आमदार आहे म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ. ठाकरे सरकार हे प्रताप सरनाईक यांना माफ करणार, परंतु महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापि माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया आज भाजपा डॉ. किरीट सोमैया यांनी या पत्राद्वारे दिली आहे.