
पुण्यात माझ्यावर हल्ला (Attack On Kirit Somaiya) होऊनही पुणे पोलीस स्वस्थ बसले आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. मी ठाकरे सरकारमधल्या (Scams Of Thackeray Government) लोकांचे घोटाळे बाहेर काढतो म्हणून माझ्यावर हल्ला सुरु आहे. तरीही मी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.
मुंबई : मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या (Attack On Kirit Somaiya) करणं हा ठाकरे सरकारचा प्लॅन आहे. पुण्यामधील (Pune) हल्ल्याचे अनेक व्हिडिओ ( Kirit Somaiya Attack Video) समोर आले आहेत. पुण्यात माझ्यावर हल्ला होऊनही पुणे पोलीस स्वस्थ बसले आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. मी ठाकरे सरकारमधल्या लोकांचे घोटाळे बाहेर काढतो म्हणून माझ्यावर हल्ला सुरु आहे. तरीही मी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत झालेल्या हल्लाप्रकरणी आठ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणाला पकडलेले नाही. पण, पथके रवाना केल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायऱ्यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले. एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून तो हवेत भिरकावला व त्या शर्टने सोमय्या यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलर पकडून हाताने जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसऱ्या पायरीवरून ओढले. त्यामुळे सोमय्या पडले व त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागला. त्यानंतर सोमय्या यांच्या गाडीसमोर शहरअध्यक्ष मोरे हे झोपले. तर, इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हाताने व बुक्क्यांनी मारहाण केली. हातात दगड घेऊन सोमय्या यांच्या जीवास धोका पोहचविण्यास उद्देशाने थांबले होते, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास विक्रम गौड हे करत आहेत.
दरम्यान, या कालावधीत मोठा गोंधळ उडाला होता. शिवसैनिकांनी मोठमोठ्याने घोषणाबाजी केली. सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी परिसरात धाव घेतली. त्यानंतर ते पोलीस ठाण्यात गेले व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. अधिक तपास पोलीस करत आहेत.