pratap sarnaik and kirit somayya

१८ कोटी १० लाख प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना भरावे लागतील. ते भरले नाही तर उच्च न्यायालयात (High Court) जाणार असल्याचे भाजप नेते माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले आहे.

    मुंबई : ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या छाबय्या विहंग गार्डनवर (Chhabayya Vihang Garden) लावलेल्या दंडमाफी प्रकरणी मुख्यमंत्री राज्यातील जनतेची फसवणूक करत आहेत. सहा महिन्यात सरनाईकांना पैसे भरायचे होते असे नोटीसमध्ये म्हटले होते. १८ कोटी १० लाख प्रताप सरनाईक यांना भरावे लागतील. ते भरले नाही तर उच्च न्यायालयात जाणार असल्याचे भाजप नेते माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले आहे.

    उद्धव ठाकरेंची सेना माफिया सेना
    पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले की, २०१२ मध्ये प्रताप सरनाईक यांचे बांधकाम तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंची सेना माफिया सेना झाली असून कोरोनाचा काळ म्हणजे कमाईचा काळ असे त्यांना वाटत होते, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. माफिया सेनेला धडा शिकवणार कोरोना काळात कोणत्या कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले, त्यात कोणी किती कमावले हे जनतेसमोर येवू द्या, असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्याना दिले. मात्र त्यांच्यात हिंमत नाही, हे काम आपण करणार असून माफिया सेनेला धडा शिकवणार, असा दावाही सोमय्या यानी केला आहे.

    २१ कोटी रक्कम होत असल्याचा आरोप
    अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत ठाणे महानगरपालिकेने प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला तीन कोटी ३३ लाख दंड ठोठावला होता. यापैकी या कंपनीने २५ लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती. उर्वरित तीन कोटी आठ लाखांची रक्कम व त्यावरील १८ टक्के दराने व्याजाची एक कोटी २५ लाखांची रक्कम सरनाईक यांच्याकडून बाकी होती. मात्र एकूण २१ कोटी रक्कम होत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला.