किरीट सोमय्यांची पोलिसांविरोधात तक्रार दाखल

नवघर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांनी पोलिसांविरोधात तक्रार अर्ज दिल्यानंतर कारवाईंची मागणी केली आहे. आयपीसी कलम ३४०, ३४१, ३४२, १४९ अंतर्गत कारवाईची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच या सर्व घडलेल्या सर्व प्रकाराबाबत ठाकरे सरकारने माफी मागावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

    मुंबई : माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांची मुलुंड पोलीस ठाण्यांमध्ये मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि एसीपी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. १९ तारखेला मुंबई पोलिसांनी बेकायदेशीररित्या घरामध्ये सहा तास मला स्थानबद्ध करून ठेवल्याचा आरोप माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पुढील चोवीस तासांमध्ये मुंबई पोलिसांनी माझी माफी मागावी अन्यथा इतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे अशा इशारा किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दिला आहे.

    नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर किरीट सोमय्या एम आर ए पोलीस ठाण्याकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी ही माहिती दिली. आयपीसी कलम ३४०, ३४१, ३४२, १४९ अंतर्गत कारवाईची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच या सर्व घडलेल्या सर्व प्रकाराबाबत ठाकरे सरकारने माफी मागावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

    मंगळवारी मी पुन्हा सकाळी १० वाजता कोल्हापूरला अंबे मातेचं दर्शन घेण्यासाठी मी जाणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान  ठाकरे सरकार एवढं घाबरतं का? मी फक्त अलिबागला बंगले पाहायला गेलो होतो, मग ठाकरे सरकारला एवढे घाबरण्याचे कारण काय असा प्रश्न किरिट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. पुढील २४ तासात पोलिसांनी माफी मागावी अशी मागणी माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाबाबत सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.