पुन्हा नवा घोटाळा ? अनिल परब यांनी म्हाडाची जागा बळकावून केले अनधिकृत बांधकाम, किरिट सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार

अनिल परब (anil parab)यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा(mhada plot) बळकावली. या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असे सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांच्यासह रविंद्र वायकर यांच्यावर भुखंड खरेदी घोटाळ्याचे(land purchasing scam) आरोप केले आहेत.

    मुंबई :भाजप प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या(kirit somayya) यांनी आता शिवसेनेचे परिवहनमंत्री अनिल परब (anil parab) यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. अनिल परब यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा बळकावली. या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असे सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह  रविंद्र वायकर यांच्यावर भुखंड खरेदी घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

    म्हाडाच्या जागेत अनधिकृत कार्यालय
    वांद्रे येथील म्हाडाच्या दोन इमारतींमधील मधल्या जागेत अनिल परब यांनी अनधिकृतरित्या आपले कार्यालय थाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. विलास शेगले हे या अनधिकृत बांधकामाबाबत संघर्ष करत आहेत. २७जून २०१९ रोजी म्हाडाने अनिल परब यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर ठाकरे सरकारच्या दबावामुळे अनिल परब यांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई झाली नसल्याचे किरीट सोमय्यांचे म्हणणे आहे.

    महापौरांवर आरोप
    किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप केले होते. किशोरी पेडणेकर यांनीही त्यांच्या कंपनीसाठी जागा बळकावली. ही जागा समाजकल्याण केंद्र आणि झोडपट्टी पुनवर्सन यंत्रणेची SRA आहे. SRA ने देखील ही बाब मान्य केली आहे. महापौरांच्या या कार्यालयाच्या पत्त्यावर आणखी आठ कंपन्या स्थापन झाल्या आहेत. या सर्व कंपन्यांविरोधात आपण सक्तवसुली संचलनालयाकडे ED तक्रार करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला होता.