किरीट सोमय्या पुन्हा ‘या’ दिवशी कोल्हापूर मोहीमेवर, राजकीय वातावरण पुन्हा ढवळण्याची शक्यता

येत्या मंगळवारी किरीट सोमय्या (Kirit Somayya)यांनी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन(Ambabai Darshan) घेणार असल्याचे सांगितले आहे.

  कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांनी पुन्हा एकदा कोल्हापूर दौरा (Kirit Somayya To Visit Kolhapur)जाहीर केला आहे. येत्या मंगळवारी किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन(Ambabai Darshan) घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

  किरीट सोमय्यांना आधीच्या दौऱ्याच्या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापुरात येऊ न देता कराडमधून माघारी धाडण्यात आले होते. सोमय्यांना परत धाडण्यावरून राज्य सरकारमधील गृह कलह समोर आला होता. त्यामुळे पुढील दौऱ्यात काय होणार ? याची आता उत्सुकता आहे.

  सोमवारी कोल्हापूरला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास सुरू केल्यानंतर मुंबईपासून कराडपर्यंत पोलीस माजी खासदार किरीट सोमय्या यांची कोल्हापूरला जाऊ नये, यासाठी मनधरणी करत होते. ठाण्यासह सातार्‍यात पोलिसांनी चर्चा करत रेल्वेतून उतरण्याची विनंतीही केली होती.

  कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी कराड रेल्वेस्टेशनवर कोल्हापूर जिल्हा प्रवेश मनाईचा आदेश किरीट सोमय्या यांच्या हाती दिला आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कराडच्या विश्रामगृहात आणण्यात आले. मुंबईपासून रविवारी रात्री ८.३० वाजता सुरू झालेला हा आठ तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा कराडला पहाटे ४.३० वाजता समाप्‍त झाला.

  मुंबईतून कोल्हापूरला येत असताना छत्रपती शिवाजी टर्मिनसबाहेर आपणास अडवण्यात आले होते. तेथे रेल्वे मिळू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी प्रयत्न करत खोटा मनाई आदेश वाचून दाखवला. त्यानंतर आदेशाची मागणी करताच पोलीस पळून गेल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

  रेल्वेने प्रवास सुरू केल्यानंतर ठाण्यातही स्थानिक पोलिसांनी आपणास कोल्हापूरला जाऊ नये, असे सांगत रेल्वेतून उतरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आपण आदेश दाखवण्याची मागणी केली. पोलीस आदेश दाखवू शकले नाहीत, असे सोमय्या म्हणाले.