ajit navale

२७ सप्टेंबर रोजी राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्यावतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. त्याच दिवशी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे, त्यास ही कृती पूरकच आहे.

    अहमदनगर : सोयाबीनचे दर १११११ रुपयांवरून कोसळून केवळ २० दिवसांमध्ये ४००० रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेने ग्रासले गेले आहेत. केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर १२ लाख टन जी. एम. सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे.

    २७ सप्टेंबर रोजी राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्यावतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. त्याच दिवशी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे, त्यास ही कृती पूरकच आहे.

    शेतकऱ्यांनी कोसळलेल्या दराला घाबरून जाऊन पॅनिक सेलिंग करू नये. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थिती पाहता सोयाबीनला चांगला दर नक्की मिळेल. अशी चिन्हे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करताना संयम ठेवावा. आपला माल बाजारात आणताना काही टप्पे करावेत. चांगला दर मिळाल्याशिवाय सोयाबीन न विकण्याचा सामूहिक निर्णय घ्यावा असे आवाहन किसान सभेने केले आहे. अशी माहिती राज्य समन्वयक, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्र डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.