‘त्या’ मजुरांचा मुंबईला रामरामचा नारा –  म्हणतायत, गड्या आपला गाव बरा

मुंबई: मुंबईने कधीही कुणाला उपाशी ठेवल नाहिये, अशी ख्याती आहे. पण मागील काही दिवसांपासून मुंबई कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे.कोरोनाच्या संकटाने मुंबईकर चिंतित आहेत. नोकऱ्या, रोजगार,

मुंबई:  मुंबईने कधीही कुणाला उपाशी ठेवल नाहिये, अशी ख्याती आहे. पण मागील काही दिवसांपासून मुंबई कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. कोरोनाच्या संकटाने मुंबईकर चिंतित आहेत. नोकऱ्या, रोजगार, व्यवसाय बंद आहेत. या मुंबापुरीत देशाच्या कानकोपऱ्यातून अनेक जण टिचभर पोटाची खळगी भरण्याकरता येत असतात.यात मोठ्या प्रमाणावर गरीब लोक असतात. गरीबीमुळे ते राहत असलेल्या प्रांतात नोकरी अथवा मोलमजूरीचा काहीही पर्याय नसल्याने हे लोक मुंबईत दाखल होतात. दिवसभर अंगमेहनत करायची आणि रात्री मुंबईचे फुटपाथवर कब्जा करायचा अथवा पत्रा वजा प्लास्टिक कापडाचे झोपडे बांधायच नि निवांत झोपायचे. वर्षानुवर्ष हे गरीब मजूर असच काहीसे आयुष्य जगत आले आहेत. मात्र  मागील काही दिवसांपासून मुंबईत  सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे या मजूरांना दोन वेळेच्या ख़ाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. मुंबईतील छोटे मोठे अनेक व्यवसाय लॉकडाऊनमुळे ठप्प आहेत. यामुळे मोलमजूरीची सर्व कामे बंद आहेत. रोज कुठेही पोटापुरते कमवायचं, आणि खायचं हे या लोकांच्या अंगवळणी पडल्याने गाठीशी चार पैसा नाहिये, ज्यामुळे सध्या या गोरगरीब, स्थलांतरित मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे.

दुसरीकडे, मुंबईतील अनेक सेवाभावी संस्था , गुरुद्वारा या कामगार, मजुरांना दोन वेळच जेवण मिळावे म्हणून पुढे सरसावल्या आहेत.असे असताना देखील काम नाही, अजुन किती दिवस कोरोनाचे संकट असणार आहे? यातून बाहेर निघल्यानंतर हाताला काम मिळेल का? असे अनेक प्रश्न या मजूर कामगारांना भेडसावत आहे.

 काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला जेवण दिले, पण पुढे काय करायच, असा प्रश्न रोजंदारीवर काम करणाऱ्या अम्मप्पा हिला पडला आहे. अनेक मजुरांनी गेल्या दोन दिवसांमध्ये गावाकडे जाण्याचा मार्ग पत्करला आहे. निदान गावात शेती किंवा इतर काम करुन चार पैसे मिळतील, अशी आशा मन्सूरने व्यक्त केली.

 गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक गोरगरीब कामगार मजुरांनी गावी जाण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्रासाठी मुंबईतील हॉस्पिटल, पोलीस स्टेशन बाहेर लांबच लांब रागा लावलेल्या दिसून येत आहेत.

“हमें गांव जाना है, बम्बई में और कितने दिन भूखे रहेंगे.. गांव में कुछ भी काम करेंगे फिर बाद का बाद में देखेंगे…” राजू सांगत होता. अशी मानसिकता अनेक मजूर कामगारांची झाली आहे.

दरम्यान, उपासमारी, पोराबाळाची उपासमारी आणि हाताला काम नसल्याने पुन्हा आपल्या गावाकडे परतणारे हताश मजूर मुंबईकडे पाठ फिरवित आहेत. ते पुन्हा मुंबईत येण्याची आता चिन्हे दिसत नाहीत. त्यांनी मुंबईला रामराम करत आपला गाव बरा असेच आपल्या कृतीतून दर्शविले आहे.