#हिवाळी अधिवेशन २०२० (LIVE) | दोन दिवसांच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस, रस्त्यावर उतरण्याचा देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट12 महीने पहले

दोन दिवसांच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस, रस्त्यावर उतरण्याचा देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा

ऑटो अपडेट
द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
14:35 PMDec 15, 2020

तर आम्ही रस्त्यावर उतरू

आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. मराठा समाज सध्या शांत आहे. आमच्या काळात मराठा आरक्षणावर स्थगिती आली नव्हती. मात्र आता ती आली आहे. ओबीसी आरक्षणात जर कुणाला वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. 

13:52 PMDec 15, 2020

हे सरकार चर्चा न करताच काम उरकणारं सरकार - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रासमोर सध्या अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना चर्चा न करताच कामकाज उरकणारं हे सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी केली. शक्तीी कायदा आणि इतर मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

महिला आणि बालकांवरील अन्यायाला प्रतिबंध करणारा शक्ती कायद्याबाबत पुरेशी चर्चा होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. इतक्या महत्त्वाच्या आणि आवश्यक कायद्यावर चर्चा न होणं ही बाब योग्य नसल्याचं ते म्हणाले.

या सरकारला चर्चा करण्यात रस नसूून कामे उरकण्यातच रस असल्याची टीका त्यांनी केली.

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (मंगळवार) दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन दोनच दिवसांचे घेण्याचा निर्णय सरकारच्या वतीनं घेण्यात आलाय. पहिल्या दिवशी अनोख्या प्रकारची आंदोलनं, पोस्टरबाजी आणि आमदारांची हटके स्टाईलची आंदोलनं यांनी गाजला.

आज आमदार रवी राणा यांनी हक्कभंगाची नोटीस दाखल केलीय. मुंबई पोलीस आयुक्त आणि अमरावती पोलीस आयुक्त यांच्याविरोधात हा हक्कभंग दाखल केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केल्याप्रकरणी घरातच स्थानबद्ध केल्याबद्दल त्यांनी हा हक्कभंग दाखल केलाय.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
०८ बुधवार
बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

आरक्षणाची आवश्यकता सांख्यिकीय आकडेवारीने सिद्ध करणार नाही तोपर्यंत ओबीसींना आरक्षण लागू करता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे रास्त आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.