राज्यात चार ठिकाणी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, तर दोन ठिकाणी चुरशीचा सामना होणार

विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती, त्यामुळे सकाळपासूनच जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत होत्या. अखेर तीन वाजपेर्यंत राजकीय तडजोडींमधून राज्यातील सहा पैकी चार जागा बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाला, त्यानुसार विरोधी अर्ज मागेही घेतल्या गेले. मात्र दोन जागांचा तिढा न सुटल्याने या ठिकणी निवडणूक होत चुरशीचा सामना पाहयाल मिळणार आहे.

    मुंबई : राज्यात सध्या सहा जागासाठी विधानपरिषद निवडणुक होणार आहे. आणि या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती, त्यामुळे सकाळपासूनच जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत होत्या. अखेर तीन वाजपेर्यंत राजकीय तडजोडींमधून राज्यातील सहा पैकी चार जागा बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाला, त्यानुसार विरोधी अर्ज मागेही घेतल्या गेले. मात्र दोन जागांचा तिढा न सुटल्याने या ठिकणी निवडणूक होत चुरशीचा सामना पाहयाल मिळणार आहे.

    राज्यातील सहा पैकी बिनविरोध झालेल्या चार जागांमध्ये मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारच्या प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे. तर, नागपूर आणि अकोला-वाशीम-बुलडाणा येथील जागेवर लढत होणार आहे. नागपूरमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस, तर अकोला-वाशीम-बुलडाणा येथे शिवसेना विरुद्ध भाजपा लढत होत आहे.

    कोल्हापूरमध्ये भाजपा उमेदवार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे. धुळ्यामध्ये भाजपाचे अमरिश पटेल हे बिनविरोध होत आहेत. याशिवाय, मुंबईमधील बिनविरोध झालेल्या दोन जागांवर भाजापाचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे यांची वर्णी लागलेली आहे. तर, नागपूरमध्ये भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर हे आमनेसामाने आहेत. याचबरोबर, अकोला-वाशीम-बुलढाणा मतदारसंघात भाजपाकडून वसंत खंडलवाल आणि महाविकासआघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजेरिया हे निवडणूक रिंगणात आहेत. आमदार गोपीकिश बाजेरिया हे आतापर्यंत तीन वेळा विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत.

    कोल्हापूरातून अमल महाडिक यांनी विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा विधानपरिषदेवरील मार्ग मोकळा झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या झालेल्या बैठकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा झाली. यानुसार मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारच्या जागेवर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजप नेते धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना अमल महाडिक यांचा अर्ज मागे घेण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. धनंजय महाडिक म्हणाले की, आता इथूनपुढे राज्यात जिल्हा परिषद अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे राज्यात समन्वय राहावा आणि सलोखा राहावा म्हणून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानुसार निर्णय झाला आहे. मुंबई भाजपसाठी महत्त्वाची जागा होती ती विजयी करण्यासाठी काँग्रेसनं माघार घेतली परंतु त्याविरोधात कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी होती असे धनंजय महाडिक म्हणाले आहेत.

    धुळे नंदुरबारची जागाही आम्हाला मिळाली पाहिजे अशी मागणी भाजपने आग्रही ठेवल्यामुळे अमरिश पटेल यांचीही निवडणूक बिनविरोध करायची म्हणजे भाजपच्या दोन जागा आणि त्याविरोधात कोल्हापूरची एक जागा त्यांना देण्यात यावी असे ठरले. फडणवीसांनी फोन करुन अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानुसार कोल्हापूरमधून विधानपरिषदेसाठी अमल महाडिक यांचा अर्ज भरला होता. तसेच शोमिका अमल महाडिक यांचा अर्ज भरला होता हे दोन्ही अर्ज मागे घेतले आहेत या निवडणुकीमध्ये महादेवराव महाडिक यांनाही फोन करुन फडणवीसांनी सुचना दिल्या असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.