महिलेवर बिबट्याचा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

सीसीटीव्हीत कैद झालेल्या घडनेनुसार, बिबट्या घराच्या मागे लपला होता त्यावेळी महिला बाहेर कट्ट्यावर असण्यासाठी आली. महिला बाहेर येऊन बसल्यावर आधीच दबाधरुन बसलेल्या बिबट्याने महिलेवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सदर महिला जखमी झाली. लिंकवर क्लिक करुन पाहा पुर्ण घटनेचा थरार..

    मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये वारंवार बिबट्या आढळून येत आहे. आता बिबट्याने या परिसरात रहाणाऱ्या एका महिलेवर हल्ला असून ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा सर्व प्रकार सायंकाळी 7.45 वाजता घडला. बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा महिलेने लाठीने प्रतिकार करून त्याला पाळवले.

    नेमकं काय घडलं

    सीसीटीव्हीत कैद झालेल्या घडनेनुसार, बिबट्या घराच्या मागे लपला होता त्यावेळी महिला बाहेर कट्ट्यावर असण्यासाठी आली. महिला बाहेर येऊन बसल्यावर आधीच दबाधरुन बसलेल्या बिबट्याने महिलेवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सदर महिला जखमी झाली.

    दरम्यान, या हल्ल्यानंतर जखमी महिलेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि आता महिलेची तब्बेत व्यवस्थित असल्याचे सांगितले जात आहे. मागच्याच आठवड्यामध्ये चार वर्षाच्या एका लहान मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्याने सध्या आरे कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण आहे. हा सर्व प्रकार सायंकाळी 7.45 वाजता घडला.

    पाहा पुर्ण घटना