
लोंढे म्हणाले की, काँग्रेसच्या मतांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमचा उमेदवार गरीब होता. भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. भाजपाकडे ९० मते जास्त असतानासुद्धा मतदारांना घेऊन त्यांना राज्याबाहेर पळावे लागले. त्यांना घोडेबाजार करावा लागला, हा खऱ्या अर्थाने भाजपाचा नैतिक पराभव आहे. लोकांमधून होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव केला. निवडणुकीत हार जीत होतच असते, काँग्रेस व मित्रपक्षांनी विजयासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले मात्र विजय मिळवण्यात आम्ही कमी पडलो, आम्ही कुठे कमी पडलो? याचे आत्मपरिक्षण करू.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार करुन विजय मिळवला आहे. मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा स्वीकार करून पक्ष या पराभवावर आत्मचिंतन करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, काँग्रेसच्या मतांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमचा उमेदवार गरीब होता. भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. भाजपाकडे ९० मते जास्त असतानासुद्धा मतदारांना घेऊन त्यांना राज्याबाहेर पळावे लागले. त्यांना घोडेबाजार करावा लागला, हा खऱ्या अर्थाने भाजपाचा नैतिक पराभव आहे. लोकांमधून होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव केला.
निवडणुकीत हार जीत होतच असते, काँग्रेस व मित्रपक्षांनी विजयासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले मात्र विजय मिळवण्यात आम्ही कमी पडलो, आम्ही कुठे कमी पडलो? याचे आत्मपरिक्षण करू. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी काम केलेल्या काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लोंढे यांनी आभार मानले.
दरम्यान, नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ होते. मात्र, काँग्रेसने यात चमत्कार घडवण्याचा दावा केला होता. त्यांचा दावा हवेत राहिला. काँग्रेस-महाविकास आघाडीची 16 मते फुटली. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले रविंद्र भोयर यांना एक मत मिळाले. मतदानाच्या काही तास आधीच काँग्रेसने रविंद्र भोयर यांचा पाठिंबा काढत देशमुख यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.