न्यायालयीन कोठडी मिळताच आपल्याला विशिष्ट कारागृहात ठेवण्यात यावे, अशी विनंती करणारा अर्ज शर्मा यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. आपल्या जीवाला भायखळा येथील आर्थर रोड, नवी मुंबईतील तळोजा कारागृहात धोका संभवतो. त्यामुळे आपली ठाणे कारागृहात रवानगी करण्यात यावी, तसेच पोलीस संरक्षण पुरविण्याबाबतही विचार करावा, असे शर्मा यांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्याची दखल घेत शर्मा यांच्या अर्जावर कारागृह प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.
मुंबई : अँटालिया स्फोटकं आणि व्यावसायिक मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणात मास्टरमाईंड असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले माजी पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांना सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
न्यायालयीन कोठडी मिळताच आपल्याला विशिष्ट कारागृहात ठेवण्यात यावे, अशी विनंती करणारा अर्ज शर्मा यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. आपल्या जीवाला भायखळा येथील आर्थर रोड, नवी मुंबईतील तळोजा कारागृहात धोका संभवतो. त्यामुळे आपली ठाणे कारागृहात रवानगी करण्यात यावी, तसेच पोलीस संरक्षण पुरविण्याबाबतही विचार करावा, असे शर्मा यांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्याची दखल घेत शर्मा यांच्या अर्जावर कारागृह प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.
शेलार आणि जाधव यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी
व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येत संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांचाही रिमांड संपत असल्यामुळे त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनाही न्यायालयाने 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
दुसरीकडे, मनिष सोनी आणि सतीश मुठेकरी यांनी या घटनेनंतर परदेशवारी केल्याची माहिती माहिती समोर आली असून त्याची अधिक माहिती मिळावी यासाठी त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. म्हणून दोघांनाही एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एनआयएकडून करण्यात आली त्याची दखल घेत त्यांना १ जुलैपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली.