Live dogs buried in walls in Mumbai

बोरिवलीत मुक्या प्राण्यांबाबत क्रुरतेचा कळस गाठणारी घटना घडली असून सुमारे २० ते २२ कुत्र्यांना भिंतीतच गाडले आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Live dogs buried in walls in Mumbai).

    मुंबई : बोरिवलीत मुक्या प्राण्यांबाबत क्रुरतेचा कळस गाठणारी घटना घडली असून सुमारे २० ते २२ कुत्र्यांना भिंतीतच गाडले आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Live dogs buried in walls in Mumbai).

    मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीच्या विसा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पौर्णिमा शेट्टी या दररोज परिसरातील ३०० भटक्या कुत्र्यांसह मांजरींना दररोज जेवण द्यायच्या, परंतु, बोरिवलीतील देविदास लेनवरील कुत्र्यांना जेवन देत असताना त्यांना नेहमीपेक्षा २० ते २२ कुत्रे कमी आढळून आले.

    त्यांनी आजूबाजुला पाहणी केली असता अँक्लीविरा ग्रँडच्या पार्किंगच्या बाजूच्या मोकळ्या जागेतील भिंतीमध्ये कुत्र्यांना गाडल्याचे भयानाक दृष्य त्यांच्या नजरेसमोर पडले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.