Live Update | मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट6 महीने पहले

मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

ऑटो अपडेट
द्वारा- Dnyaneshwar More
कंटेन्ट रायटर
10:52 AMJun 12, 2021

मुंबई, ठाणे, पालघर रायगडला रेड अलर्ट, जोरदार पाऊस सुरु

08:17 AMJun 12, 2021

दहिसर चेकनाक्यावर पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आज रस्त्यावर गाड्या कमी असल्या तरी वाहतूक कोंडीचं चित्र कायम आहे.

08:16 AMJun 12, 2021

मुंबईच्या पश्चिम उपनगरात सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या समोर रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. तसंच अंधेरी सब वेमध्येही गुडघ्याभर पाणी साचलं आहे. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे सायनमध्ये पाणी साचलं होतं.

08:18 AMJun 11, 2021

लालबाग, परळ, भायखळा, माझगाव दादर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दुसरीकडे वसई विरारमध्ये रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे.

मुंबई : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली.

दरम्यान मुंबईत काल, गुरुवारी सकाळपासून थोड्या प्रमाणात पाऊस पडला. पण त्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसह मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे मुंबईच्या सखल भागात पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नवी मुंबईतल्या वाशीतही जोरदार सरी बरसत आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
०८ बुधवार
बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

आरक्षणाची आवश्यकता सांख्यिकीय आकडेवारीने सिद्ध करणार नाही तोपर्यंत ओबीसींना आरक्षण लागू करता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे रास्त आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.