students allowed local travel

नव्या वर्षात कोरोनाची सर्व बंधने शिथील होतील ही आशा फोल ठरली आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत असणारी कोरोना प्रतिबंधाचे नियम राज्य शासनाने ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवले आहेत. परिणामी, शाळा, रेल्वे, हाॅटेल आणि लोकल, विवाह व इतर सार्वजनिक कार्यक्रमाला लावलेले कोरोनाचे नियम ३१ जानेवारीपर्यंत कायम असणार आहेत.

मुंबई : नव्या वर्षात कोरोनाची सर्व बंधने शिथील होतील ही आशा फोल ठरली आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत असणारी कोरोना प्रतिबंधाचे नियम राज्य शासनाने ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवले आहेत. परिणामी, शाळा, रेल्वे, हाॅटेल आणि लोकल, विवाह व इतर सार्वजनिक कार्यक्रमाला लावलेले कोरोनाचे नियम ३१ जानेवारीपर्यंत कायम असणार आहेत.

मिशन बिगीन अंतर्गत राज्य शासन कोरोनाची स्थिती पाहून कोरोना प्रतिबंधाचे नियम टप्प्याटप्प्याने शिथील करत आणले आहेत. कोरोना प्रतिबंधांचे बहुतांश नियम आता उठवलेले आहेत. केवळ प्रतिबंधित क्षेत्रात या नियमांची अंमलबजवणी केली जात आहे.

मात्र, शाळा अद्याप चालु नाहीत, हाॅटेल ५० टक्के क्षमतेत चालु आहेत. मुंबई व पुण्यातील लोकल सर्वांना खुली नाही. रेल्वेच्या विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. विमान सेवेवर काही प्रणात बंधने आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमास बंदी आहे. विवाह सोहळे व अंत्यविधीवेळी उपस्थित असणाऱ्या लोकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत.

यासंदर्भातल्या नियमांना ३१ डिसेंबर २०२० अशी शेवटची मुदत होती. मात्र इंग्लडमध्ये कोरोना विषाणुचा नवा अवतार आढळल्याने केंद्र सरकार सावध झाले आहे. केंद्राने राज्य सरकारला दोन दिवसापूर्वी पत्र पाठवून ब्रिटन स्ट्रेनबाबत सावधगिरी बाळण्याची सूचना केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज साथरोग कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये अधिसूचना जारी केली. त्यानुसार सध्याची कोरोना संदर्भातली बंधने ३१ जानेवारी २०२१ पर्यंत राहतील असे स्पष्ट केले आहे.
एकुण, नव्या वर्षात कोरोनाची कटकट कायम राहणार असून कोरोनासंदर्भातील उर्वरित बंधने दूर होण्यास फेब्रुवारी-मार्च २०२१ ची वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईतील लोकल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वांसाठी खुली होण्याची शक्यता होती. कोरोनाच्या नव्या विषाणुमुळे आता त्याची शक्यता मावळली आहे.  दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली होती. मुंबईत चाचण्या झालेल्या व्यक्तींपैकी ५ टक्के रुग्णांना कोव्हिडची बाधा झाल्याचे आढळत आहे.