Local service on Trans Harbor route disrupted, pantograph-overhead wires intertwined nrsj

ठाण्याकडून पनवेल आणि वाशीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल ट्रेन जागीच थांबल्या असल्यामुळे प्रवासी अडकून बसले आहेत. कामावर पोहचण्याच्या वेळीच लोकलसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई : ट्रान्स हार्बर (Trans Harbor) मार्गावरील (route ) रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. हार्बरलाईनवरील कोपरखैरने रेल्वे स्थानकाजवळ पेंटोग्राफ- ओव्हरहेड वायर ( pantograph-overhead wires) एकमेकांत अडल्याने रेल्वे वाहतूक  (Local service ) ठप्प झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे समजते आहे.

ठाण्याकडून पनवेल आणि वाशीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल ट्रेन जागीच थांबल्या असल्यामुळे प्रवासी अडकून बसले आहेत. कामावर पोहचण्याच्या वेळीच लोकलसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. काही ना काही कारणास्तव या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. दरम्यान रेल्वे कर्मचाऱी वाहतुक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.