जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल सुरू होणार, कोरोना गाईडलाईन्स पाळून होणार जीवनवाहिनी सुरू

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वसामान्य प्रवाशांसाठी मुंबई लोकल सुरू करण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल दिला असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. मार्च महिन्यापासून मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर मिशन अनलॉकअंतर्गत हळूहळू लोकल सेवा सुरू होत आहे. मात्र सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलची सेवा सुरू असून सर्वसामान्यांनाही ती लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी धोर धरत आहे.

जानेवारी महिना सर्वसामान्य मुंबईकरांसाठी दिलासादायक असेल, असे संकेत मिळतायत. मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल रेल्वे सेवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असे संकेत मिळत आहेत. त्यासाठी सरकारनं घालून दिलेले नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. प्रवास करताना प्रत्येकानं मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय. मुंबईतील गर्दीचा विचार करता सोशल डिस्टन्सिंगचं कितपत पालन शक्य होईल, याबाबत साशंकता असली तरी इतर नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वसामान्य प्रवाशांसाठी मुंबई लोकल सुरू करण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल दिला असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. मार्च महिन्यापासून मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर मिशन अनलॉकअंतर्गत हळूहळू लोकल सेवा सुरू होत आहे. मात्र सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलची सेवा सुरू असून सर्वसामान्यांनाही ती लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी धोर धरत आहे.

जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मार्च महिन्यापासून बंद करण्यात आलेली लोकलची सेवा अगोदर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी, त्यानंतर वकिलांसाठी आणि त्यानंतर महिलांसाठी सुरू करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारनं घालून दिलेले सर्व प्रतिबंधात्मक निकष पाळून ही सेवा सुरू करण्यात आली होती. महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर पुढच्या टप्प्यात आता सर्वांसाठीच लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी जोर धऱत आहे. लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्रदेखील पाठवले होते. मात्र त्याचे अद्याप उत्तर आले नसल्याची माहिती मिळतेय.