लॉकडाऊनचा फटका; मुंबईतील ८ हजार विद्यार्थी अद्यापही परराज्यात

गेल्या वर्षी लाॅकडाउनमुळे अनेकजण गावी निघून गेले. परराज्यातून आलेले नागरिक सहकुटुंब गावाला गेले. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास सुरुवात झाल्यावर अनेकजण पुन्हा मुंबईकडे परतण्यास सुरुवात झाली. मात्र बहुतांश नागरिकांनी आपल्या मुलांना अद्यापही गावालाच ठेवले आहे.

    मुंबई: लॉकडाऊनमुळे मुंबईतील तब्बल १० हजार ८२१ मुले शाळाबाह्य ठरली आहेत. यातील ९ हजार ९९५ विद्यार्थी स्थलांतरित झाले असून, त्यातील तब्बल ८ हजार मुले ही परराज्यात गेली असून, दोन हजार विद्यार्थी ही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाली आहेत. मात्र हाताच्या बोटावरच मोजण्याइतके विद्यार्थी पुन्हा माघारी आले आहेत. त्यामुळे परराज्यात असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरिवण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत.
    गेल्या वर्षी लाॅकडाउनमुळे अनेकजण गावी निघून गेले. परराज्यातून आलेले नागरिक सहकुटुंब गावाला गेले. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास सुरुवात झाल्यावर अनेकजण पुन्हा मुंबईकडे परतण्यास सुरुवात झाली. मात्र बहुतांश नागरिकांनी आपल्या मुलांना अद्यापही गावालाच ठेवले आहे. मुंबईमधून उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, तेलंगणा, हरियाणा, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ, मिझोराम आणि आसाम या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्थलांतरित झाले आहेत.