लोकांना लाठाकाठ्यांनी मारू नका पण, कुणी…. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पोलिसांना सुचना

लॉकडाउन संदर्भात आयोजित आढावा बैठकीला नागपुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गृहमंत्र्यांनी हजेरी लावली. लॉकडाउन जेव्हा कडक होते, त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली. परंतु आता पूर्णत: लॉकडाउन नाही. त्यामुळे लोकांना लाठाकाठ्यांनी मारू नका. बळाचा अतिरेकी वापर करू नका. नियंत्रण ठेवा मात्र, कुणी उपद्रव निर्माण करीत असेल तर त्याला सोडू नका, अशा सक्त सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.

  मुंबई : गृहमंत्र्यांनी राज्यातील पोलिसांना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. राज्याचे आर्थिक चक्र थांबले आहेत. अशात नागरिकांवर अतिरेकी बळाचा वापर करू नये. लोकांना लाठाकाठ्यांनी मारू नये, निर्बंध आणि लॉकडाउनची स्थिती योग्य पद्धतीने हाताळावी. अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना केल्या आहेत.

  कुणी उपद्रव करीत असेल तर त्याला सोडू नका

  लॉकडाउन संदर्भात आयोजित आढावा बैठकीला नागपुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गृहमंत्र्यांनी हजेरी लावली. लॉकडाउन जेव्हा कडक होते, त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली. परंतु आता पूर्णत: लॉकडाउन नाही. त्यामुळे लोकांना लाठाकाठ्यांनी मारू नका. बळाचा अतिरेकी वापर करू नका. नियंत्रण ठेवा मात्र, कुणी उपद्रव निर्माण करीत असेल तर त्याला सोडू नका, अशा सक्त सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.

  वाहनांवर नेहमीप्रमाणेच कारवाई करावी

  कोरोना अद्यापही कायम आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवायचे आहे. अशात रोजगाराच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडणारच. त्यामुळे योग्य अशी कारवाई करावी, असे गृहमंत्री म्हणाले. हेल्मेट, सीटबेल्ट आदीच्या कारवाई मात्र नेहमीप्रमाणे सुरू ठेवाव्या असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाशी संवाद

  लॉकडाउन काळात पोलिसांनी विनाकारण फिरणार्‍यांना चोप दिल्याचे व्हिडिओ अजुनही सोशल मीडियावर व्हायरल होतात. नागरिकांवर केलेली ही सक्ती आणि लॉकडाउनमुळे झालेला व्यवसाय आणि रोजगाराचा प्रश्न, यामुळे सर्वांकडून लॉकडाउनला विरोध केला जात आहे. अशात ठिक-ठिकाणी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लादले जात आहेत. तरीही कोरोना नियंत्रणात आला नाही तसेच लोकांनी सहकार्य केले नाही तर लॉकडाउन लागू करावा लागेल, असा इशारा यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या पार्श्‍वभूमिवर गृहमंत्री देशमुख यांनी प्रशासनाशी संवाद साधला आहे.