पुन्हा लॉकडॉऊनचे संकेत! महाराष्ट्रात कोरोनाची भयानक स्थिती; सात दिवसांत सात पट रुग्णवाढ झाल्याने तिसऱ्या लाटेचा धोका

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ऑमीक्रोन या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घालणे सुरू केले असतानाच कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सात दिवसांत सात पट रुग्णवाढ झाली आहे. महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे.  महाराष्ट्रात कोरोनाची भयानक स्थिती ही चिंता वाढवणारी आहे(Lockdown sign again! Corona's terrible condition in Maharashtra; Risk of a third wave, seven times in seven days ).

  मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ऑमीक्रोन या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घालणे सुरू केले असतानाच कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सात दिवसांत सात पट रुग्णवाढ झाली आहे. महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे.  महाराष्ट्रात कोरोनाची भयानक स्थिती ही चिंता वाढवणारी आहे(Lockdown sign again! Corona’s terrible condition in Maharashtra; Risk of a third wave, seven times in seven days ).

  पहिल्या लाटेत रुग्णवाढ डबलिंग होण्यात 12 दिवस लागले होते. तर दुसऱ्या लाटेत 20 दिवस लागले. मात्र, चिंतेची बाब म्हणजे तिसऱ्या लाटेत फक्त 4 दिवसात रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. पुढील सहा आठवडे चिंतेचे आहेत. आपल्याला कोरोना नियम पाळून आणि स्वयं शिस्त बाळगून विषाणू सोबत जगायला शिकावं लागणार असल्याचं मत यावेळी टास्क फोर्सच्या सदस्यांही व्यक्त केले आहे.

  दुसरीकडे, राज्याच्या विधानसभेच्या 5 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 50 कोरोना प्रकरणे नोंदवण्यात आली. अधिवेशनादरम्यान 2 मंत्र्यांसह अनेक नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

  राज्यात कोरोना रुग्णाची संख्य़ा 10 हजारवर पोहचली आहे. यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. लॉकडाऊनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यासंबंधी एकत्रितपणे घेणार आहेत. सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंधांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

  राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लोकांनी काळजी न घेतल्यास पुढच्या दीड-दोन महिन्यांत संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या-त्या वेळी रुग्णसंख्येचा आकडा पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

  मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशन पार्टीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षानिमित्त होणारे कार्यक्रम, पार्टी रद्द करण्यात येतील.