विनामास्क फिरणाऱ्यांमुळे BMC झाली मालामाल ; Fine वसुलीतून तिजोरीत जमा झाले तब्बल ७८ कोटी

बीएमसीने झोन-१ (BMC Zone-1) मधील पाच लाख २८ हजार २४२ लोकांवर कारवाई केली असून १० कोटींहून अधिक दंड (Fine) वसूल केला आहे. तसेच, झोन-२ मध्ये बीएमसीने पाच लाख २९ हजारांहून अधिक लोकांकडून दंड वसूल केला आहे. (Zone - 3)मध्ये बीएमसीने चार लाख २२ हजारांहून अधिक लोकांकडून दंड वसूल केला आहे.

    मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचा कहर (Coronavirus Pandemic) मंदावला आहे. पण धोका अजून टळलेला नाही. कोरोनाचा सर्वाधिक तांडव झालेल्या महाराष्ट्रातील मुंबईतील बीएमसी कोविडबाबत (Mumbai BMC Fine) कडक आहे. या सगळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्यांकडून ७८ कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे.

    बीएमसीने झोन-१ (BMC Zone-1) मधील पाच लाख २८ हजार २४२ लोकांवर कारवाई केली असून १० कोटींहून अधिक दंड (Fine) वसूल केला आहे. तसेच, झोन-२ मध्ये बीएमसीने पाच लाख २९ हजारांहून अधिक लोकांकडून दंड वसूल केला आहे. (Zone – 3)मध्ये बीएमसीने चार लाख २२ हजारांहून अधिक लोकांकडून दंड वसूल केला आहे. यासोबतच इतर झोनचीही स्थिती अशीच आहे.

    त्याचवेळी महाराष्ट्रात कोरोनाचे ९६० नवीन रुग्ण आढळले आहेत. यासोबतच ४१ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६६,३२,२५७ झाली असून मृतांची संख्या १,४०,८०७ वर पोहोचली आहे.