महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चे थकीत सेवाशुल्कावरील चारशे कोटी रुपयांचे व्याज माफ : जितेंद्र आव्हाड

गेली अनेक वर्ष नागरिकांनी सेवा शुल्क भरले नव्हते. त्यांच्यासाठी आम्ही अभय योजना सुरू केली आहे. त्यानुसार आम्ही थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच थकीत सेवा शुल्क एकत्र न भरता ५ वर्षात १० हप्त्यात भरू शकता, अशी सवलत दिली आहे.

    मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ने थकीत सेवाशुल्कावरील तब्बल चारशे कोटी रुपयांचे व्याज माफ केल्याने म्हाडा वसाहतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. अभय योजने अंतर्गत म्हाडाच्या वसाहतीत राहणार्‍या रहिवाशांना हा मोठा दिलासा मिळाला आहे एक एप्रिल १९९८ ते २०२१ पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

    सेवा शुल्क ५ वर्षात १० हप्त्यात भरण्याची मुभा

    गेली अनेक वर्ष नागरिकांनी सेवा शुल्क भरले नव्हते. त्यांच्यासाठी आम्ही अभय योजना सुरू केली आहे. त्यानुसार आम्ही थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच थकीत सेवा शुल्क एकत्र न भरता ५ वर्षात १० हप्त्यात भरू शकता, अशी सवलत दिली आहे. म्हाडाच्या इमारतीत राहणार्‍या १ लाख ८१ हजार रहिवाशांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे आता म्हाडात जाऊन रांगेत उभे राहून पैसे भरायची गरज नसून ऑनलाइन प्रणालीद्वारे घरबसल्या सेवा शुल्क भरता येणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.