मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, नवीन बाधीतांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधीक

मृतांची संख्या मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढू लागली आहे. शुक्रवारी नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात सहा रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. दरम्यान, भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त करण्यात आली असून पुढील काळात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईत मंगळवारी (११ जानेवारी) ११ हजार ६४७ रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसातलीही ही सर्वात कमी संख्या होती. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. रुग्णांची संख्याही २५ हजारांच्या पुढे गेली होती. पण, चार दिवसांपासून रुग्णांची संख्या ही कमी-अधिक होताना दिसत आहे.

    शुक्रवारी महाराष्ट्रात कोविड-१९ चे ४३,२११ नवीन रुग्ण आढळले. ३३,३५६ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला तर १९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात Omicron चे २३८ नवीन रुग्ण आढळले आहेत. Omicron च्या एकूण प्रकरणांची संख्या १,६०५ आहे. अशा प्रकारे, एक दिवस आधी आलेल्या प्रकरणांपेक्षा एकूण प्रकरणे कमी आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात ४६,४०६ नवे रुग्ण आढळले.

    सध्या मुंबई पालिकेच्या करोना उपचार केंद्रात सहा हजार ४३२ रुग्ण दाखल असून १६.८ टक्के रुग्णशय्या व्यापलेल्या आहेत. तर एका दिवसात तब्बल २२ हजार ०७३ रुग्ण करोनामुक्त झाले. शुक्रवारी ११ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या नऊ लाख ८१ हजारांच्या पुढे गेली आहे.

    मुंबईत मंगळवारी (११ जानेवारी) ११ हजार ६४७ रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसातलीही ही सर्वात कमी संख्या होती. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. रुग्णांची संख्याही २५ हजारांच्या पुढे गेली होती. पण, चार दिवसांपासून रुग्णांची संख्या ही कमी-अधिक होताना दिसत आहे.

    मृतांची संख्या मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढू लागली आहे. शुक्रवारी नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात सहा रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. दरम्यान, भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त करण्यात आली असून पुढील काळात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे.

    दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग शोधण्यासाठी घरगुती चाचणी किटचा वापर वाढल्याने बीएमसीने शहरातील घरगुती प्रतिजन चाचणी किटचे उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेत्यांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गुरुवारी जारी केलेल्या आदेशात, नागरी संस्थेने घरगुती प्रतिजन चाचणी किटचे उत्पादन, पुरवठा आणि विक्रीसाठी जबाबदार असलेल्यांना प्रत्येक दिवशी ठराविक तपशील नागरी अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांना विहित नमुन्यात ईमेल करण्याचे निर्देश दिले आहेत.