एसटीच्या अनेक प्रलंबित आर्थिक मुद्द्यांसंदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची खासदार शरद पवार यांच्यासोबत आज बैठक

परिवहन मंत्री  यांच्या समवेत बैठक झाली व या बैठकीत एसटी कामगारांची आर्थिक देणी देण्याचे परिवहन मंत्री यांनी मान्यता दिलेली आहे. व या संदर्भात संघटनेची मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्र्यांसमवेत बैठक आपल्या समवेत लावण्याची विनंती केली व ही बैठक लावण्याचे खासदार शरद पवार यांनी मान्य केले आहे.

    सध्या आर्थिक संकटामुळे एस टी कर्मचारी अतिशय विपरीत मनस्थितीमध्ये असून आत्महत्ये सारखे दुर्दैवी व टोकाचे पाऊल उचलत आहेत. तेव्हा एसटी ची व कर्मचा-याची परिस्थिती बदलायची असेल तर राज्यसरकाने आमचे पालकत्व स्विकारून एस टी महामंडळाचे विलीनीकरण राज्यशासनात करावे अशी आग्रही मागणी केली आहे.

    जनरल सेक्रेटरी  हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन एस टी कामगारांच्या अनेक प्रलंबित मुद्यावर सविस्तर चर्चा केली. २ व ३ % महागाई भत्याचा फरक ५% महागाई भत्ता फरकासह लागू करणे. केंद्राला आता २८% म.भत्ता लागू झालेला आहे. घरभाडे भत्ता ८/१६/२४ % करणे वेतनवाढीचा दर ३% करणे, एकतर्फी वेतनवाढ रू ४८४९ कोटी रू मधील उर्वरीत रक्कम ग्रेड पे च्या स्वरूपात देणे या आर्थिक मुद्यावर चर्चा करत असताना दि. १५ जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे आपण व  परिवहन मंत्री  यांच्या समवेत बैठक झाली व या बैठकीत एसटी कामगारांची आर्थिक देणी देण्याचे परिवहन मंत्री यांनी मान्यता दिलेली आहे. व या संदर्भात संघटनेची मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्र्यांसमवेत बैठक आपल्या समवेत लावण्याची विनंती केली व ही बैठक लावण्याचे खासदार शरद पवार यांनी मान्य केले आहे.