
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आत्तापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या 32 ओमायक्रॉन बाधितांपैकी 25 रूग्णांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं या 25 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. ही काहीशी दिलाशाची बाब आहे. मात्र हा दिलासा कायम राहणार का हा प्रश्न आहे कारण ओमायक्रॉन व्हेरियंटवर आपल्या कोरोना लशी परिणाम कारक नसतील अशी भीती नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी व्यक्त केलंय. सध्या देशात 53 कोरोना रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय. आणि हा प्रसार आणखी वेग पकडण्याची भीती आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट omicron ने राज्यात चिंता वाढवली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आज ओमायक्रॉनचे (Omicron) आणखी 4 रुग्ण आढळले आहेत. यापैकी २ रुग्ण उस्मानाबाद, १ रुग्ण मुंबई तर १ रुग्ण बुलढाणा इथला आहे. यामुळे राज्यात एकूण ३२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत १३, पिंपरी-चिंचवडमध्ये १०, पुणे मनपा क्षेत्रात २, उस्मानाबादमध्ये २ तर कल्याण-डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई विरारआणि बुलडाणामध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आत्तापर्यंत ३२ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या ३२ ओमायक्रॉन बाधितांपैकी २५ रूग्णांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं या २५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. ही काहीशी दिलाशाची बाब आहे. मात्र हा दिलासा कायम राहणार का हा प्रश्न आहे कारण ओमायक्रॉन व्हेरियंटवर आपल्या कोरोना लशी परिणाम कारक नसतील अशी भीती नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी व्यक्त केलंय. सध्या देशात ५३ कोरोना रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय. आणि हा प्रसार आणखी वेग पकडण्याची भीती आहे.
महाराष्ट्रात बुधवारी ९२९ कोरोना बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ६४६७ रुग्ण सक्रिय आहेत. तसेच राज्यातील रिकव्हरी दर ९७.७२% आहे. ताज्या अपडेटनुसार, २४तासांत कोविड-१९ मुळे १० मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर २.१२% आहे. सध्या ७५,८६८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि ८६४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.