महाविकास आघाडी सरकारने २ वर्ष जनतेचे फसवणूक केली – दरेकर

राज्यात सत्तेत येऊन महाविकास आघाडी सरकारला नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारचे दोन वर्ष फसवणुकीचे अशी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. दरम्यान या दोन वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, असे विविध प्रश्न हे प्रलंबित आहेत, व हे प्रश्न मार्गी लावण्यात या सरकारला अपयश आल्याची घणाघाती टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

    मुंबई : राज्यात सत्तेत येऊन महाविकास आघाडी सरकारला नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारचे दोन वर्ष फसवणुकीचे अशी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. दरम्यान या दोन वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, असे विविध प्रश्न हे प्रलंबित आहेत, व हे प्रश्न मार्गी लावण्यात या सरकारला अपयश आल्याची घणाघाती टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

    मागील दोन वर्षात या सरकारने शेतकरी, कामगार, एसटी कर्मचारी यांची फसवणूक केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजले आहेत. मागील दोन वर्षात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, तसेच शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की, नाही असा प्रश्न पडला आहे. सत्तेत येण्यापुर्वी या सरकारने अनेक आश्वासनं आणि वचने दिले होते त्याची पूर्तता करण्यात या सरकारला अपयश आले आहे.

    दरम्यान निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एसटी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात येईल असा वचननामा जाहीर केला होता, त्या वाचननामाचे काय झाले? अशा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. दरम्यान पवार आणि अनिल परब यांची गुप्त बैठक होत झाली, यावर सुद्धा त्यांनी टीका केली, मागील पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले असताना, या सरकारला त्याचे काहीच पडले नाही, यापूर्वीच यावर तोडगा काढता आला असता, पण हे सरकार यावर चालढकल करत आहे. अशी बोचरी टीका सुद्धा प्रवीण दरेकर यांनी केले.

    दरम्यान काल रासपचे नेते महादेव जानकर यांनी पक्षाला घरचा आहेर देताना आमची सत्ता असते वेळ सुद्धा एसटी विलीनीकरण करण्यात आली नव्हती, असं म्हणत पक्षाला घरचा आहेर दिला होता. यावर सुद्धा प्रवीण दरेकर यांनी महादेव जानकर यांचा समाचार घेतला एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व पडळकर करत आहेत, त्यामुळे महादेव जानकर यांना कोणी विचारत नसल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असावे, असे दरेकर म्हणाले. दरम्यान मागील दोन वर्षाचा लेखाजोखा आणि महाविकास आघाडी सरकार या दोन वर्षात कसे अपयशी ठरले आहे, याचा आढावा प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत मांडला.