125 कोटींच्या मानहानीच्या दाव्यात मोठा ट्विस्ट! नवाब मलिकांना वानखेडेंविरोधात वक्तव्य करण्यापासून रोखू शकत नाही पण… कोर्टाचा आदेशांनतर मलिक म्ह सत्यमेव जयते

गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियात समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खुलासे करत असलेल्या मंत्री नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कार्यकर्त्यांना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जोपर्यंत ते मानहानीचा दावा दाखल करत नाही, तोवर कोणताही आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला(Malik gets High Court order - Wankhede family is not relieved).

    मुंबई :  गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियात समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खुलासे करत असलेल्या मंत्री नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कार्यकर्त्यांना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जोपर्यंत ते मानहानीचा दावा दाखल करत नाही, तोवर कोणताही आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला(Malik gets High Court order – Wankhede family is not relieved).

    दरम्यान, न्यायालयाने मलिक यांनाही वाजवी पद्धतीने खातरजमा करूनच ट्वीट करण्याचे निर्देशही दिले. सोमवरी झालेल्या सुनावणीवेळी मलिक यांनी केलेली विधाने योग्य पद्धतीने तपासून केलेली नाही त्यामुळे भविष्यात मलिक यांनी याबाबत भान ठेवावे, अशी तंबीही हायकोर्टाने दिली.

    दुसरीकडे, कोणताही दिलासा देण्याचे फेटाळल्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘सत्यमेव जयते. चुकीविरुद्ध लढाई सुरूच राहील’ असे म्हटले आहे.

    आर्यन खान केस प्रकरणापासून समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नवाब मलिक यांनी मोर्चाच उघडला आहे. त्यांनी धर्म आणि जातीवरून वानखेडे यांच्याविरोधात दररोज एक खुलासा केला आहे. त्यामुळे वानखेडे चांगलेच अडचणीत आले आहेत.