मुंबईत मोठ्या गे से क्स रॅकेटचा पर्दाफाश! यांची एकमेकांना कॉन्टॅक्ट करुन भेटायची सिस्टीम पाहून पोलिसही चक्रावले

मालवणी पोलिसांनी तीन जणांना अटक करुन मागील अनेक महिन्यांपासून ऑनलाइन डेटींग गे अॅपद्वारे गे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ग्रिंडर या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे समलिंगी समाजातील सदस्यांशी संपर्क साधला आणि त्यांना मालवणी परिसरात त्यांच्या कार्यालयात किंवा घरी सेक्ससाठी सशक्त तरुणांची हमी दिली(Malvani police expose gay sex racket, gay dating app).

    मुंबई : मालवणी पोलिसांनी तीन जणांना अटक करुन मागील अनेक महिन्यांपासून ऑनलाइन डेटींग गे अॅपद्वारे गे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ग्रिंडर या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे समलिंगी समाजातील सदस्यांशी संपर्क साधला आणि त्यांना मालवणी परिसरात त्यांच्या कार्यालयात किंवा घरी सेक्ससाठी सशक्त तरुणांची हमी दिली(Malvani police expose gay sex racket, gay dating app).

    इरफान फुरकान खान (२६), अहमद फारुक शेख (२४) आणि इम्रान शफीक शेख (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोहेल आणि इतर अज्ञात आरोपी अद्याप फरार आहेत.

    पोलिसांनी सांगितलं, की ग्राइंडरअॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरावी लागते. त्यानंतर त्या भागातल्या सर्व समलिंगी मुलांचा तपशील त्यात येतो. मग आपल्या लोकेशन असलेल्या भागात एकमेकांशी ते संपर्क साधत असतात. संबंधित तरुणही या अॅपद्वारे एकमेकांशी संपर्कात राहिले. आधी गप्पा आणि नंतर अनैतिक संबंध असा हा प्रकार घडला.

    मालवणीचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांनी सांगितलं, की १७ जानेवारीच्या रात्री एका हाय-प्रोफाइल मुलाचे आरोपींशी ‘गे अॅप’द्वारे संबंध आले, काही दिवस ऑनलाइन चॅटिंग केल्यानंतर आरोपीनं त्याला भेटण्यासाठी बोलावलं. जेव्हा पीडित तरूण त्यांला भेटायला गेला, तेव्हा आरोपींनी 5 तरुणाशी अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करायला सुरुवात केली.

    तरुणानं हे करण्यास नकार दिल्यावर आरोपीनं त्याला मारहाण केली. त्याचा आयफोन, डेबिट कार्ड, रोख रक्कम हिसकावून घेतली. तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवला, सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि व्हिडिओ डिलीट करण्याच्या नावाखाली ५० हजारांची मागणी सुरू केली.

    आरोपींची कार्यपद्धती पाहता या टोळीचे आणखी लोक बळी ठरल्याची भीती व्यक्त होत आहे. “आम्ही सर्व आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अटक आरोपींना सोमवारी बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.