Mamata Banerjee to meet Chief Minister Uddhav Thackeray and Sharad Pawar; Didi's Mumbai tour on November 30

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये रणशिंग फुकण्याची तयारी प. बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरु केली आहे. यासाठी सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याचसाठी ३० नोव्हेंबरला ममतदीदी या मुंबईत येत आहेत. या मुंबई दौऱ्यात त्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत(Mamata Banerjee to meet Chief Minister Uddhav Thackeray and Sharad Pawar; Didi’s Mumbai tour on November 30).

    ममता बॅनर्जी दोन दिवस मुंबईत राहणार असून, मोदीविरोधी गटासाठी ताकद मिळवण्याच्या आणि पक्ष विस्ताराचा त्यांचा प्रयत्न आहे. प. बंगाल विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर ममता दीदी आणि त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. आता या पक्षाचा विस्तार देशाच्या पातळीवर करण्याचा त्यांचा विचार आहे. तर मोदींविरोधात आगामी निवडणुकांसाठी विरोधकांची मोट बांधण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरु आहे. मात्र काँग्रेस सोबत त्यांचे फारसे पटताना दिसत नाही.

    भाजपा आणि काँग्रेस वगळता देशात तिसरा पर्याय उभा करण्याचा ममता दीदी यांचा मानस आहे. ममता दीदींना प. बंगाल विधानसभा निवडणुका जिंकवून देणारे राजकीय रणवनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी मध्यंतरी शरद पवार यांच्याही भेटी झाल्या होत्या. या भेटींचा संदर्भही या ममतादीदींच्या दौऱ्यामागे असण्याची शक्यता आहे.

    बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्येही होणार सहभागी

    मुंबईत ३० नोव्हेंबरला होणाऱ्या बिझनेस समिटमध्येही ममता दीदी सहभागी होणार आहेत. आगामी काळात त्या मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा दोराही करणार आहेत.