सख्खा बाप मुलांच्या जीवावर उठला, आईस्क्रीममध्ये मिसळलं ….. – आईच्या तक्रारीमुळे प्रकार उघडकीस

    मुंबई : घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्याच ३ मुलांना विष खायला घातल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. मानखुर्दमध्ये(Mankhurd) ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या ३ मुलांना आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचे औषध मिसळून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर २ मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    कौटुंबिक वादातून त्या व्यक्तीने आईस्क्रीमधून उंदीर मारण्याचे औषध त्याच्या ३ मुलांना दिले. त्यानंतर ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर ७ आणि २ वर्षाच्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांच्या आईच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांना गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

    “मानखुर्द येथील एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून हे पाऊल उचचले आहे. आईस्क्रीमद्वारे विष दिल्याने ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलांच्या आईच्या तक्रारीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे,” असे मानखुर्द पोलिसांनी सांगितले.