ठाणे सत्र न्यायालयचा ATS ला धक्का! मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यात यावा ; सचिन वाझे आणि हॉटेलमध्ये आलेल्या महिलेचं काय आहे कनेक्शन ?

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास थांबवून कागदपत्रे एनआयएकडे देण्यात यावेत. असा आदेश ठाणे सत्र न्यायालायने दिला आहे. तुमचा तपास तात्काळ थांबवा आणि हत्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवा, असं आदेशात स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे ATS आणि राज्य सरकारला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.

    मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला मोठा धक्का दिला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास थांबवून कागदपत्रे एनआयएकडे देण्यात यावेत. असा आदेश ठाणे सत्र न्यायालायने दिला आहे. तुमचा तपास तात्काळ थांबवा आणि हत्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवा, असं आदेशात स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे ATS आणि राज्य सरकारला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.

    दुसरीकडे एनआयएला सचिन वाझेंबाबत अनेक प्रकारचे नवीन पुरावे मिळत आहेत. दो दिवसाआधी एका पंचतारांगित म्हणजेच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एनआयएने छापा टाकाला असता एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. यामध्ये पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे हे ज्यावेळी हॉटेलमध्ये थांबले होते. त्यादरम्यान, एक महिला त्यांना भेटण्यासाठी आली होती. त्या महिलेजवळ नोट मोजणारी मशीन होती. यावर एनआयएला आता शंका उपस्थित झाली असून त्या महिलेच्या चौकशीत वाढ करण्यात आली आहे.

    ही महिला सुद्धा पूर्णपणे या प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता उपस्थित होत आहे. कारण वाझे हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले असता, त्यांच्याजवळ पाच बँग होत्या. त्यामधील एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे वाझेंना भेटण्यासाठी आलेल्या महिलेला या प्रकरणाची पूर्णपणे माहिती असावी, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत.

    दरम्यान, सचिन वाझे १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान खोटं नाव, आधार कार्ड आणि फोटो दाखवून मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत होते. सोमवारी एनआयए वझेंना घेऊन येथे आली होती. त्यानंतर जवळपास तीन तास सीन रीक्रिएशन करण्यात आला होता. त्याचवेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहण्यात आले होते. येथील स्टाफची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्याकडूनही काही माहिती मिळाली असता त्याची नोंद करण्यात आली आहे.