Many were lobbying for the post of Mumbai Congress president; Finally the appointment of Bhai Jagtap

"अजित पवार जेव्हा बोलतात, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी दम असतो. त्यांना त्यांचा पत्ता ओपन करू द्या. बघू समोर काय होतं. असे अनेक पत्ते आहेत. आम्ही सुद्धा आमच्या छातीजवळ धरलेले आहेत. वेळ येईल तेव्हा आम्हीही आमचे पत्ते खेळू," असं म्हणत भाई जगताप यांनी काँग्रेसच्याही संपर्कात काही नेते असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्येही मोठ्या काळात इनकमिंग होणार असल्याची चिन्हे आहेत.  नव निर्वाचीत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी एक लक्षवेधी वक्तव्य केले आहे.

“अजित पवार जेव्हा बोलतात, तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी दम असतो. त्यांना त्यांचा पत्ता ओपन करू द्या. बघू समोर काय होतं. असे अनेक पत्ते आहेत. आम्ही सुद्धा आमच्या छातीजवळ धरलेले आहेत. वेळ येईल तेव्हा आम्हीही आमचे पत्ते खेळू,” असं म्हणत भाई जगताप यांनी काँग्रेसच्याही संपर्कात काही नेते असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला. तर, पक्षात मेगा भरती होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती.