
मुंबईत जवळपास सात लाख ४५ हजार नागरिकांनी प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेतलेली नाही. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात पहिल्या मात्रेचे लसीकरण १०४ टक्के झाले आहे. नियोजित वेळ उलटून गेल्यानंतरही हे नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. यात मुंबईबाहेरील नागरिकांची संख्याही लक्षणीय असल्याचे सांगत पालिकेने ही नावे वगळण्याची विनंती केली आहे. लशीच्या दुसऱ्या मात्रेकडे मुंबईकरांनी पाठ फिरवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
मुंबई : एकिकडे करोनाच्या नव्या ओमायक्राँन या व्हेरियंटने धोका वाढू लागला असताना, आणि शासन प्रशासन वारंवार काळजी घेण्याची सूचना करत असताना, दुकरीकडे मात्र मुंबईत जवळपास सात लाख ४५ हजार नागरिकांनी प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेतलेली नाही. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात पहिल्या मात्रेचे लसीकरण १०४ टक्के झाले आहे. नियोजित वेळ उलटून गेल्यानंतरही हे नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. यात मुंबईबाहेरील नागरिकांची संख्याही लक्षणीय असल्याचे सांगत पालिकेने ही नावे वगळण्याची विनंती केली आहे. लशीच्या दुसऱ्या मात्रेकडे मुंबईकरांनी पाठ फिरवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या मात्रेच आकडेवारीनुसार मुंबईत फक्त ७६ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा पूर्ण केली आहे. ‘कोविन’च्या आकडेवारीनुसार, मुंबईत सुमारे सुमारे सात लाख ४५ हजार नागरिकांची दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटून गेली तरी ते अजून लसीकरणासाठी आलेले नाहीत. यात सुमारे सहा लाख ७९ हजार नागरिक हे कोविशिल्ड तर सुमारे ६५ हजार हे कोव्हॅक्सिन लस घेतलेले आहेत. नियोजित वेळ होऊनही दुसरी मात्रा न घेणाऱ्यांचे प्रमाण मुंबईत सर्वाधिक म्हणजेच ६५ हजार ५३४ हे अंधेरी पश्चिम ( के पश्चिम) भागात आहे. तर त्या खालोखाल ग्रॅण्टरोड (५२ हजार ७६८), मालाड (४७ हजार ४६) आणि भायखळा (४५ हजार ९००) या विभागामध्ये आहे. तर दुसऱ्या मात्रेसाठी सर्वात कमी म्हणजे चार हजार ८६६ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही. अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने पालिकेची चिंता वाढली आहे.
दरम्यान, मुंबईत लसीकरण ज्या विभागात अधिक झाले, तेथे दुसऱ्या मात्रेसाठी न आलेल्यांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे दुसरी मात्रा पूर्ण न केलेल्यांची संख्या अधिक याचा अर्थ लसीकरण कमी असा होत नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दुसरी मात्रा घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. परंतु बरेच जण सुट्टय़ांच्या काळात बाहेरगावी गेलेले आहेत, तर काही जणांना सुट्टय़ांच्या काळात लस घेऊन आजारी पडायच्या भीतीने अजून लसीकरणासाठी आलेले नाहीत. मुंबईत राहणारे, मुंबईत पहिली मात्रा घेतलेले, मुंबईबाहेरून पहिली मात्रा घेण्यासाठी आलेले अशी नऊ वर्गामध्ये दुसरी मात्रा न घेणाऱ्यांची वर्गवारी केली आहे. एकिकडे करोनाच्या नव्या ओमायक्राँन या व्हेरियंटने धोका वाढू लागला असताना, आणि शासन प्रशासन वारंवार काळजी घेण्याची सूचना करत असताना, दुकरीकडे मात्र मुंबईकरांनी असं गाफिल राहणे हे गंभीर असल्यांच डॉक्टरांनी म्हटले आहे.