पश्चिम रेल्वेलाही मराठी भाषेचं वावडं? मराठी भाषा विभागाने पत्र लिहून उपटले कान

केंद्र शासनाच्या (Central Government) त्रिभाषा सूत्रानूसार आपल्या कार्यालयीन कामात इंग्रजी (English) व हिंदी (Hindi) बरोबरच राज्याच्या प्रादेशिक मराठी भाषेचा ( Marathi Language) वापर करणे कायद्याने (As Per Law) बंधनकारक आहे. परंतू केंद्र सरकार (Central Government) त्रिभाषा सूत्राचा योग्य प्रकारे वापर करीत नसल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई : अ‍ॅमेझॉनने (Amazon) मराठी भाषेची आपल्या व्यवहारात गळचेपी केल्यानंतर मनसेने (MNS) अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजलं आहे. त्यानंतर आता कोकण रेल्वेसह (Konkan Raiway)  पश्चिम रेल्वेनेही (Western Railway) त्रिभाषा सूत्रानूसार मराठीला स्थान दिले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने पश्चिम रेल्वेलाही (Marathi language department ) पत्र (Letter) लिहून त्यांचे कान उपटले आहेत.

महाराष्ट्र ऑफिशियल लँगवेज अ‍ॅक्ट (Maharashtra Official Language Act) आणि घटनेच्या कलम ३४५ नूसार मराठी ही महाराष्ट्र राज्याची राज्य भाषा आहे. केंद्र शासनाच्या (Central Government) त्रिभाषा सूत्रानूसार आपल्या कार्यालयीन कामात इंग्रजी व हिंदी बरोबरच राज्याच्या प्रादेशिक मराठी भाषेचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतू केंद्र सरकार त्रिभाषा सूत्राचा योग्य प्रकारे वापर करीत नसल्याचे उघडकीस आले आहे. मराठी भाषेला हिंदी आणि इंग्रजी भाषेचे समान स्थान दिले जात नसल्याचे उघडकीस आले आहे.

केंद्र सरकारच्या रेल्वे, बँक, वित्तीय संस्था आणि इंश्युरन्स कंपन्यांमध्ये मराठी भाषेचा योग्य सन्मान केला जात नसल्याच्या तक्रारी वारंवार शासनाकडे येत असल्याने राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने यासंदर्भात सकारात्मक विचार करून तातडीने आवश्यक पावले उचलावीत असे मराठी भाषा विभागाने खडसावले आहे.