आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मराठवाडा जनविकास परिषदेकडून मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

कोरोना काळात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेले कार्य हे मोलाचे आहे. कोविड १९ ची परिस्थिती हाताळताना, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी त्यांनी दाखवलेला सय्यम आणि आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा हि वाखाणण्याजोगी होती.त्यासाठी त्यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी दाखवलेली कार्यतत्परता कौतुकास्पद होती.

    मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेले कार्य हे मोलाचे आहे. कोविड १९ ची परिस्थिती हाताळताना, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी त्यांनी दाखवलेला सय्यम आणि आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा हि वाखाणण्याजोगी होती.त्यासाठी त्यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी दाखवलेली कार्यतत्परता कौतुकास्पद होती.

    मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे, यांच्या कडून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना त्यांच्या कोरोना काळात केलेल्या प्रशंसनीय कामगिरी बद्दल कृतज्ञता व्यक्त करून, मराठवाडा भूषण हा पुरस्कार प्रदान करत आहे. असे संस्थेचे सचिव डॉ अविनाश भागवत यांनी संस्थेच्या ऑनलाईन पुरस्कार कार्यक्रमात सांगितले.