मातोश्रीवर धमकीचे फोन करणारा अटकेत, सुरक्षा यंत्रणेची मोठी कारवाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी धमकीचे फोन अल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली होती. गृहमंत्र्यांनासुद्धा धमकीचा फोन आले आहेत. कंगना रणौत प्रकरणामुळे हे फोन आल्याचे समजते आहे. या प्रकरणी सुरक्षा यंत्रणा चौकशी करत होती.

मुंबई : मातोश्रीवर फोन करुन धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. (Matoshree’s threatening caller arrested) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना रविवारी धमकीचे फोन आले होते. मुख्यमंत्र्यांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यानाही धमकीचा फोन आला होता. फोन करुन धमकी देणाऱ्या आरोपींना एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांनी कोलकाताहून अटक केली आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात आज ४ वाजता पत्रकार परिषद ठेवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी धमकीचे फोन अल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली होती. गृहमंत्र्यांनासुद्धा धमकीचा फोन आले आहेत. कंगना रणौत प्रकरणामुळे हे फोन आल्याचे समजते आहे. या प्रकरणी सुरक्षा यंत्रणा चौकशी करत होती.

धमकीचे फोन आलेल्यांना क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली. या आधारावर प्रकरणाचा शोध सुरु होता. धमकी देणाऱ्या आरोपी कोलकाताला असल्याचे समजले होते. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानावर दुबईवरुन अज्ञात व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली होती. उद्धव ठाकरे यांना ठार मारणार तसेच मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.